Status Update
By Shantaram Onkar Nikam
भुताटकी
एक हॉरर फिल्म बघून येत होतो.सोबत मित्रही होते.फिल्म मोठी असल्यामुळे उशिरा समाप्त झाली .शो रात्रीचा होता.साडे बारा वाजता सुटला होता.फिल्म जबरदस्त घाबरवणारी होती.तिचे मुजिक अतिशय भयानक होते.मित्र होते बरोबर म्हणून ठीक होते.एकटा असतो तर अर्धी फिल्म सोडून अक्षरशः पळून आलो असतो.असे कितीतरी वेळा केले आहे मी .बघायला एकदम डेरिंग ने जायचे आणि मग असे घाबरायचे .पण काय करणार ?लहानपणी आपल्यावर जे संस्कार झालेले असतात.ते असे सहजासहजी जाणार असतात का?
सिनेमा घराच्या बाहेर आलो तर रिक्षाही नव्हत्या .सगळीकडे सामसूम झाली होती.सिनेमा घरापासून आमचे घर म्हणजे जवळजवळ चार किलोमीटर .मित्र म्हणाले चला जावूया चालत .म्हंटले चला .आम्ही चालत यायला लागलो .बर्याच ठिकाणी रस्त्यावरची लाईट बंद होती .मग एकमेकाला चिकटून चालायला लागायचे .पाहिलेल्या फिल्मचे काही किस्से चघळायला सुरुवात केली.मग आणखी कुठला हॉरर सिनेमा कसा चांगला होता.भीतीदायक होता.हे एकेकाने सांगायला सुरुवात केली .मग घडलेल्या घटना सांगायला सुरुवात झाली .
एकाने सांगितले ,'माझे आजोबा एकदा गावावरून येत होते तेंव्हा त्यांना रस्त्यात एक कृश झालेली म्हातारी एका लहान गोंडस बाळाला मांडीवर घेवून बसली होती.माझे वडील जवळ आल्यावर म्हातारी म्हणाली ,'बाबा,माझे एक काम करशील का? वडिलांनी होकार दिल्यांनतर तिने त्या बाळाला पुढच्या गावात पोचवण्यासाठी सांगितले .तिने सांगितले ह्याची आई आजारी आहे .तिच्यापर्यंत याला पोचवून दे .तिने त्याच्या आईचे नाव सांगितले .माझ्या वडिलांनी त्या बाळाला बरोबर घेतले.म्हातारीने आशीर्वाद दिला.वडील बाळाला घेवून चालू लागले .अंधार पडला होता पण चंद्राच्या प्रकाशामुळे वडिलांना वाट दैस्त होती.थोडे पुढे आल्यानंतर रस्ता निर्जन झाला ,वडील चालतच होते.पण अचानक वडिलांना त्या मुलाचे वजन वाढले आहे असे वाटले.त्यांनी त्या मुलाकडे पहिले मुलगा खेळत होता .गालातल्या गालात हसत होता.वडील पुढेपुढे चालत होते.वडिलांना पुन्हा वजन वाढल्याचा भास झाला त्यांनी त्या मुलाकडे पहिले.तो मुलगा हसत होता.खेळत होता.आणखी पुढे गेल्यावर त्या मुलाचे वजन वडिलांना पेलता येवू नये इतके वाढले .वडिलांनी मुलाकडे पहिले मुलगा खेळत होता गालातल्या गालात हसत होता.आणि अचानक वडिलांना जमिनीवर काहीतरी घासल्याचा आवाज येवू लागला म्हणून वडिलांनी खाली पहिले तर त्या मुलाचे पाय जमिनीवर घसरत होते वडिलांचा थरकाप उडाला पण घाबरून उपयोग नव्हता.वडील संधीची वाट बघू लागले आणि गावाजवळच्या देवळाजवळ आल्यानंतर त्यांनी त्या मुलाला जमिनीवर टाकून दिले आणि घराकडे धूम ठोकली .आणि वडिलांना नंतर थंडी ताप आला ,
आजूबाजूचे लोक दुसऱ्या दिवशी घरी आले तेंव्हा त्यांनी देवाचे आभार मानले .म्हणाले देवानेच याला वाचवले .थोडा आणखी उधे आला असतास तर आम्हाला दिसला नसतास.आपल्या गावचे बरेच लोक गायब झाले आहेत .
त्याने गोष्ट संपवली प माझ्या अंगाचा थरकाप उडाला होता.हात पाय लटलट कपात होते आम्ही घराच्या जवळपास आलो होतो. घर आले तो निघून गेला .पुढे अनंताचे घर आले तो निघून गेला .मी आणि विश्वास होतो .आम्ही चाललो होतो.मी मनातून खूप घाबरलो होतो पण दाखवत नव्हतो .माझेच घर सर्वात शेवटी होते.विश्वास हि निघून गेला मी एकटाच घराकडे जात होतो.घर आणखी तसे बरेच लांब होते पण दिसत होते.मी झपझप घराकडे निघालो माझ्यास चपलांचा आवाज मला भीतीदायक वाटायला लागला.पण घर नजरेच्या टप्प्यात होते म्हणून काही भीती नव्हती,सगळीकडे सामसूम होती .मधेच कुत्रे ओरडत होते .एक कुत्रे माझ्या मागे मागे येत होते मला खूप भीती वाटली .पण ते लहान पिल्लू होते अतिशय गोंडस होते त्याचे लुटुलुटू चालणे रात्रीही मनोरंजक वाटत होते.कदाचित त्याला भूक लागली असेल म्हणून मी त्याला उचलला आणि घराकडे चालायला लागलो.थोडा पुढे जात नाही तो मला तो थोडा जड वाटला.मी त्याच्याकडे पहिले पण तो शांत होता.थोडे आणखी पुढे चालल्यानंतर तो आणखी मला जाणवेल इतका जड झाला .मी त्याच्या पायांकडे उगीचच पहिले पाय तेवडेच होते.आणखी थोडा पुढे गेलो.घर नजरेच्या टप्प्यात असूनही का येत नव्हते कळत नव्हते.मी घराकडे जात असताना अचानक माझ्या गालाला काहीतरी थंड म्हणजे चाटल्यासारखे वाटले .मी भीतीमुळे कुत्र्याकडे बघितले तर हातातील कुत्र्याने हाथभर जीभ बाहेर काढून माझ्या गालाला चाटायला घेतले होते.क्षणभर मला काहीच कळले नाही .आणि अचानक मित्राने सांगितलेली गोष्ट आठवली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली .मी पटकन त्या कुत्र्याला खाली टाकून दिले आणि धूम ठोकण्याचा प्रयत्न केला पण पण मला पळताही येत नव्हते .खूप प्रयत्न करून पळालो .गेट न खोलताच गेटवरून उडी टाकून घराकडे पळालो.जोरजोरात दरवाज्यावर थापा मारल्या पण कुणीही दरवाजा खोलत नव्हते . रात्रीचे जवळ जवळ दोन वाजले होते..मागे पाहिले तर तो कुत्रा भला मोठा झाला होता आणि टाचा उंच करून जीभ कडून माझ्याच कडे पाहत होता.मी खूप ओरडण्याचा प्रयत्न केला पन भीतीमुळे माझ्या गळ्यातून आवाजच बाहेर निघत नव्हता .कुत्रा टाचा वर करकरून माझ्याकडे एकटक बघत होता आणि हसत होता.मी जोरजोरात ओरडण्याचा प्रयत्न करत होतो पण शब्दच गोठले होते .खूप प्रयत्न केल्यानंतर माझ्या घाश्यातून आवाज निघाला .दबलेला.जशी आपली मन कोणी दाबली आणि आपण ओरडलो तर जसा आवाज येईल तसाच.
आणि बायकोने विचारले काय झाले ?स्वप्न पडले का ? मला तिच्या आवाजाने क्षणभर गोन्ध्लाल्यासारखे झाले .नंतर लक्षात आले स्वप्नच पडले असणार.पण मी म्हणालो ,'माझा हाथ अवघडला होता.'तिने संवाद वाढवला नाही.मला झोप लागत नव्हती मी सर्व घटना पडताळून पाहत होतो.आज कुठला सिनेमा पहिला आठवत नव्हते .पहिलाच नव्हता तर काय आठवणार होते.आज मी नऊ वाजताच झोपलो होतो .स्वप्नच होते ते .मी अंथरुणात चुळबुळत होतो . आणि कधीतरी झोप लागली .
सकाळी उठल्यावर पत्नी माझ्याकडे बघून मिस्कील हसत म्हणाली ,'काय हो काल स्वप्न पहिले का ?'
मी नाही म्हणालो
पण ती म्हणाली झेपत नाही तर कशाला वाचता रहस्यमय गोष्टी? काल तुम्ही एक रहस्यमय पुस्तक वाचता वाचताच झोपले होते.
म्हणजे हॉरर सिनेमा बिनेमा काही बघितला नव्हता तर?
मी काही न बोलता अंघोळीसाठी मोरीत पळालो .

No comments:
Post a Comment