...हे ब्राह्मणी दहशतवादी नसतील कशावरून?
महानायक संपादकीय दि.८ जुलै 2013
जगातील बौद्धांचे प्रेरणास्थान असलेल्या बुद्धगया येथील महाबोधी विहार परिसरात बॉम्बस्फोट घडवून जगातील बौद्धांना डिवचण्याचा प्रयत्न शांतताविरोधी शक्तींनी केला आहे. मानवी कल्याणाचे उद्दिष्ट जगासमोर सर्वप्रथम ठेवणाऱया महामानव तथागत सम्यक सम्बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेल्या पवित्र स्थळावर क्रौर्य आणि हिंसेचे प्रदर्शन करणाऱया या अमानवीय घटनेचा आम्ही जळजळीत निषेध करतो. त्याबरोबरच या बॉम्बस्फोटाच्या मागे असलेल्या अतिरेकी शक्तींना तात्काळ शोधून काढून कायद्यानुसार योग्य अशी शिक्षा त्यांना देण्यात यावी अशी आम्ही अखिल बौद्धांच्या वतीने मागणी करतो. भारतामध्ये कोठेही बॉम्बस्फोट झाले तरी त्या मागे अमुक-तमुक मुस्लिम संघटना असल्याचा कांगावा ब्राह्मणी प्रसारमाध्यमे करीत असतात. बुद्धगयेत झालेल्या बॉम्बस्फोटामागेही अशाच एका मुस्लिम संघटनेचा हात असल्याचा कांगावा शेंडीधारी भट आणि सरकारी दहशतवादाचे अड्डे असलेल्या तपासीयंत्रणा करीत आहेत. मालेगाव, अजमेर, हैद्राबाद आणि समझोता एक्सप्रेस प्रकरणात ज्यापमाणे निर्दोष मुसलमानांना अटक करून हेच ते बॉम्बस्फोट करणारे दहशतवादी असा देखावा उभा करण्यात आला त्याप्रमाणेच बुद्धगया प्रकरणातही पुढे-मागे चौकशीचे आणि अटकेचे नाटक होऊ शकते. भारतामध्ये होणाऱया दहशतवादी कारवाया, विशिष्ट ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून त्याद्वारे जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणे यामध्ये ब्राह्मणी दहशतवादी संघटनासुद्धा गुंतल्याचे उघड झाले आहे. एवढेच नव्हे तर लष्करामध्ये आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये शिरकाव केलेल्या ब्राह्मणी दहशतवादी संघटनांच्या पाठीराख्यांनी राज्यसरकारांच्या पोलीस यंत्रणेला खोटे गुप्तचर संदेश पाठवून निर्दोष मुसलमानांचा खून केल्याचेही इशरत जहाँ प्रकरणावरून सिद्ध झालेले आहे. या स्थितीत बुद्धगयेत बॉम्बस्फोट घडविणारे ब्राह्मणी दहशतवादी नसतील कशावरून? जोपर्यंत एखाद्या घटनेमध्ये नक्की कोणती संघटना गुंतली आहे याचा ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनांचे नाव अशा घटनांशी जोडणे आणि विशिष्ट धर्माच्या लोकांविरूद्ध द्वेष निर्माण करणे हा राष्ट्रद्रोही प्रकार आहे असे आम्ही समजतो. अशाप्रकारचे वृत्त पसारित करून धार्मिक तेढ निर्माण करणाऱया प्रसारमाध्यमांविरूद्ध सरकारने कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हातात सोपविण्यात यावे ही जगभरातील बौद्धांची गेल्या कित्येक दशकांपासूनची मागणी आहे. सरकारने मात्र या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावून बौद्धांच्या या पवित्र स्थळाचे व्यवस्थापन अजूनही ब्राह्मण-पुजाऱयांच्याच ताब्यात ठेवले आहे. या विहाराचे व्यवस्थापन जर बौद्धांच्या हातात असते तर नैसर्गिक श्रद्धेपोटी याठिकाणी बौद्धांमारफत काटेकोर सुरक्षेची काळजी घेतली गेली असती. त्यामुळे या बॉम्बस्फोटास विहाराच्या ब्राह्मणी व्यवस्थापनाने सुरक्षेत केलेले दुर्लक्षसुद्धा कारणीभूत आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. ब्राह्मण-पुजाऱयांच्या ताब्यात या विहाराचे व्यवस्थापन पुढेही चालू राहिल्यास अशा घटना पुढेही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे सरकारने महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा 1949 रद्द करून या विहाराचे व्यवस्थापन पूर्णत बौद्धांच्या व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात येईल असा नवा कायदा तातडीने पारीत केला पाहिजे.
हे बॉम्बस्फोट ज्या पार्श्वभूमीवर झालेले आहेत ती पार्श्वभूमी लक्षात घेता यामागे राजकीय हिशोब चुकते करण्याचा हिशोब असू शकतो काय? हा दृष्टीकोन सुद्धा तपासी यंत्रणांनी लक्षात घेतला पाहिजे. बिहारमध्ये मागील 8 वर्षांपासून भाजपाच्या पाठिंब्यावर असलेले जनता दल युनायटेडचे नितीशकुमार सरकार कार्यरत आहे. जोपर्यंत नितीशकुमारांना भाजपाचा पाठिंबा होता तोपर्यंत बिहारमध्ये एकही दहशतवादी बॉम्बस्फोटाची घटना घडलेली नव्हती. भाजपने फॅसिस्ट मनोवृत्तीच्या नरेंद्र मोदींना भाजपच्या राष्ट्रीय प्रचार समितीचे प्रमुख बनविल्यामुळे नितीशकुमारांनी भाजपला सत्तेबाहेर केले. भाजप आणि संयुक्त जनता दलाची मैत्री संपुष्टात येताच बिहारमध्ये दहशतवादी स्वरूपाचे बॉम्बस्फोट घडून यावे यास नुसता योगायोग समजावे काय?
बुद्धगयेत झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटामागे म्यानमारमध्ये झालेल्या कथित मुस्लिम हत्यांचा संदर्भ देण्यात येत आहे. जागतिक राजकारणात मुस्लिमांना एकटे पाडून त्यांच्याविरूद्ध भू-राजकीय विद्वेष निर्माण करण्याचे राजकारण ख्रिश्चन-ज्यू-हिंदू अतिरेकी संघटनांकडून केले जात आहे असा काही मुस्लिम संघटनांचा आरोप आहे. यामध्ये अजिबात तथ्य नसावे असे म्हणता येणार नाही. जागतिक भू-राजकीय स्थितीत युरोप व अमेरिकन देशांवर प्रभुत्व असलेल्या ख्रिश्चनांशी मुस्लिमांचे हाडवैर आहे. अमेरिकेतील जागतिक व्यापार केंद्राची इमारत मुस्लिम दहशतवादी संघटनांनी उद्ध्वस्त केल्यानंतर हा सुप्त संघर्ष पराकोटीला पोहोचला आहे. जगामध्ये आतापर्यंत मुस्लिम विरूद्ध ख्रिश्चन, मुस्लिम विरूद्ध ज्यू, मुस्लिम विरूद्ध हिंदू असे संघर्ष घडले आहेत. मात्र मुस्लिम विरूद्ध बौद्ध असा संघर्ष आधुनिक काळात आतापर्यंत झाल्याचे दिसत नाही. असा संघर्ष निर्माण करणे हा सुद्धा यामागील हेतू असू शकतो हे बौद्ध आणि मुस्लिमांनी ध्यानात घेतले पाहिजे.
जगामध्ये जवळपास 69 मुस्लिम देश आहेत. याशिवाय जगातील अनेक देशात मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. जगातील एकूण लोकसंख्येपैकी ख्रिश्चनानंतर दुसऱया क्रमांकाची लोकसंख्या मुस्लिमांची आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे विशेषत जागतिक अर्थकारणावर प्रभाव पाडणाऱया तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे मुख्यत मुस्लिम देशांमध्ये आहेत. या नैसर्गिक साधनसंपत्तीवर कब्जा मिळवून जागतिक अर्थसत्ता आपल्या तालावर नाचविण्यासाठी प्रगत भांडवली देश कटकारस्थान करीत असतात. लोकप्रिय मुस्लिम सत्ताधीशांना हुसकाऊन लाऊन आपल्या मर्जीतील सत्ताधीश त्या देशात बसविण्यासाठी हे देश विशेषत: अमेरिका जगातील आपल्या अंकीत देशांच्या मदतीने असे कटकारस्थान करण्यात आघाडीवर आहे. अमेरिकन तसेच युरोपीयन भांडवलशाही तसेच प्रसारमाध्यमे मुख्यत वंशश्रेष्ठत्ववादी ज्यू अर्थात झायोनिस्ट लोकांच्या ताब्यात आहेत. जगाच्या पाठीवर केवळ 13 कोटी असलेले झायोनिस्ट आपल्याकडे असलेल्या अमाप भांडवलाच्या जोरावर जागतिक अर्थकारणावर तसेच राजकारणावर नियंत्रण ठेऊन आहेत. झायोनिस्ट आणि मुस्लिम यांचे प्राचीन काळापासून वैर चालत आलेले आहे. यामुळे वंशश्रेष्ठत्वाच्या गंडाने पछाडलेल्या झायोनिस्टांनी जगामध्ये मुस्लिम विरुद्ध ख्रिश्चन, मुस्लिम विरुद्ध हिंदू असे वैर निर्माण करुन मुस्लिमांना एकटे पाडले आहे. झायोनिस्टांच्या या प्रयत्नांना बौद्ध जगताने आतापर्यंत हाणून पाडले आहे. अफगाणिस्तानातील बामियाँ येथे असलेल्या जगातील सर्वांत मोठ्या बुद्ध मूर्तीला तालिबानी फौजांनी उद्धवस्त केल्यानंतरही बौद्धांनी कमालीचा संयम पाळला. जगातील महासत्तांमध्ये गणल्या जाणाऱया चीन, जपान, कोरिया आदी देशांमध्येसुद्धा बौद्धांनी मुस्लिमांविरुद्ध कधीही विद्वेष बाळगलेला दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर झायोनिस्ट आणि भारतातील ब्राह्मणवादी एकत्र येऊन भारतामध्ये मुस्लिम आणि बौद्धांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी अशाप्रकारच्या कारवाया करू शकतात. या दोन्ही धर्मातील सुजाण लोकांनी हा डाव वेळीच ओळखून जनतेला वस्तुस्थिती समजावून देऊन शांततेचे वातावरण बिघडू न देण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment