तेवढ्यात शाहू महाराज म्हणतात.
आम्ही कसले राजे, आम्ही तर परंपरेचे राजे, परंपरेचे राजे तर
कुणालाही होता येत.
बाबासाहेब आंबेडकर "baristor" झाल्यावर,
शाहू महाराज मुंबईतील डबक चाळीत बाबासाहेबांना भेटायला जातात.
शाहू महाराज डबक चाळीत येताच बाबासाहेबांचे सहकारी बाहेर थांबलेले असतात.
शाहू महाराज त्या सहकाऱ्याला म्हणतात कि, जा आणि बाबासाहेबांना सांग कि मी भेटायला आलोय.
तेवढ्यात बाबासाहेब घराबाहेर येतात, आणि बघतात तर काय साक्षात शाहू महाराज मला भेटायला माझ्या घरी आलेत.
एक राजा माझ्या घरी मला भेटायला आला याचे बाबासाहेबांना नवल वाटते.
आणि बाबासाहेब म्हणतात कि, तुम्ही राजे आहात, तुम्ही छत्रपती आहात.
तुम्ही जर मला सांगितले असते तर मीच कोल्हापूरला आलो असतो. तुम्ही येण्याची तसदी का घेतली.
तेवढ्यात शाहू महाराज म्हणतात.
आम्ही कसले राजे, आम्ही तर परंपरेचे राजे, परंपरेचे राजे तर कुणालाही होता येत.
पण ज्ञानाचे राजे कुणालाही होता येत नाही. तुम्ही ज्ञानाचे राजे आहात.
आणि, तुम्ही "baristor" झाला आहात. म्हणून तुमची उद्या रथातून मिरवणूक काढणार आहोत.
तुम्ही कोल्हापूरला या.
आणि मग इतिहास असा घडतो कि एक राजा एक अस्पृश्य "baristor" झाला म्हणून
रथातून मिरवणूक काढतो. आणि त्यांचा सन्मान करतो.
No comments:
Post a Comment