दलितत्वाचा वितंडवाद
by Sunil Khobragade (Notes) on Wednesday, August 1, 2012 at 5:59pm
सामाजिकदृष्ट्या उपेक्षित, कमकुवत, दुर्बल समूहांचा निर्देश करण्यासाठी दलित हा शब्द पचलित झाला आहे. केवळ भारतीय भाषांमध्येच नव्हे तर, जागतिक स्तरावरसुद्धा दलित या शब्दाला मान्यता लाभली आहे. आधुनिक मराठी भाषेतील हा एकमेव शब्द आहे जो इंग्रजी भाषेचा अधिकृत शब्दकोष समजल्या जाणाऱया `ऑक्सफर्ड डिक्शनरी'मध्ये समाविष्ट केला गेला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या भारतभेटीदरम्यान संसदेत केलेल्या भाषणात सुद्धा `दलित' हा शब्द वापरला होता. सामाजिकदृष्ट्या दडपले गेलेले पत्येक राज्यातील लोक स्वतची `तथता' व्यक्त करण्यासाठी हाच शब्द वापरतात. केवळ अनुसूचित जातीच्या लोकांनाच नव्हे तर, अनुसूचित जमाती, अन्य मागासवर्गीयांतील अतिमागास, स्त्रिया, ख्रिश्चन आणि मुस्लिमांमधील अस्पृश्य यांनासुद्धा दलित असेच संबोधले जाते. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतून धर्मातरित झालेल्या बौद्धांपैकी एक वर्ग मात्र दलित या शब्दाचा सातत्याने विरोध करीत आला आहे. दलित हा तुच्छतादर्शक, जातीवाचक शब्द आहे, आमचे दलितपण आम्ही किती दिवस मिरविणार? दलितपणाला डिलीट करण्याची गरज आहे, आम्ही आता बौद्ध झालेलो असल्यामुळे आम्हाला बौद्ध म्हणूनच संबोधण्यात यावे, असे विविध युक्तिवाद यासंदर्भात केले जातात. मात्र, या युक्तिवादांमध्ये वैचारिकतेपेक्षा भावनिकताच जास्त दिसून येते. या पार्श्वभूमीवर दलित या संबोधनाचे तार्पिक परिक्षण करणे आवश्यक झाले आहे.
दलित या शब्दाची भाषाशास्त्राrय व्युत्पत्ती तपासल्यास या शब्दाचा नेमका अर्थ कळण्यास मदत होईल. दलित या शब्दाचा मूळ धातू `दल' हा आहे. `दल' हा शब्द ख्रिस्तपूर्व दहाव्या ते सातव्या शतकात रुढ झालेल्या हिब्रू भाषेतील आहे. हिब्रू भाषेतून हा शब्द संस्कृतमध्ये आला आहे. हिब्रू भाषेमध्ये `दल' म्हणजे कमजोर, अशक्त, गरीब असा अर्थ दिलेला आहे. बायबलमध्ये या अर्थाला धरुन, ज्या व्यक्तीला निष्कांचन, असहाय्य पातळीवर ढकलण्यात आले आहे त्याचा निर्देश करण्यासाठी हा शब्द वापरण्यात आला आहे. संस्कृत भाषेमध्ये `दल' या शब्दाचा अर्थ दुभंगणे, विभाजित होणे असा होतो. `दल' हा शब्द इंडोआर्यन भाषासमूहातील शब्द आहे. या शब्दाशी जवळीक साधणारे इंग्रजी भाषेतील शब्द dale आणि जर्मन भाषेत tal हे आहेत. इंग्रजीत dale म्हणजे जमिनीला पडलेला चिरा किंवा भेग. तर जर्मन भाषेत tal म्हणजे काप किंवा विशिष्ट पद्धतीने फाडणे असा होतो. आधुनिक काळात कांतीबा ज्योतिराव फुलेंनी हा शब्द सामाजिकदृष्ट्या हिन लेखल्या गेलेल्या अतिशुद्र किंवा अस्पृश्यांचा निर्देश करण्यासाठी वापरला. हे सर्व विवेचन पाहिल्यास `दलित' हा शब्द जातीवाचक नसून स्थितीवाचक असल्याचे fिदसून येते. मात्र कांतिबा ज्योतिराव फुल्यांनी `दलित' या स्थितीवाचक शब्दाचा वापर ब्राह्मणी धर्माच्या अमानवीय वागणुकींमुळे अस्पृश्य ठरविल्या गेलेल्या जातींचा निर्देश करण्यासाठी केल्यामुळे `दलित' हा शब्द जातीवाचक असल्याचा समज रुढ झाला आहे आणि तो आजतागायत कायम आहे. `दलित' हा शब्द अनुसूचित जातींचा समानार्थी शब्द म्हणून भारतीय संविधानात किंवा कोणत्याही सरकारी अहवालात, नियमात तसेच कायद्यात वापरण्यात आलेला नाही. यामुळेच जानेवारी, 2008मध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने हा शब्द असंवैधानिक ठरवून कोणत्याही सरकारी कागदपत्रात अनुसूचित जातींचा निर्देश करण्यासाठी वापरण्यास मनाई केली आहे. हे पाहता दलित हा शब्द जातीवाचक नसून स्थितीवाचक आहे हेच सिद्ध होते. त्यामुळे दलित म्हणजे तथाकथित नीच जातीचे, असा अर्थ घेऊन आम्ही दलित नाहीत, असा दावा करणे म्हणजे भारतात आता आर्थिक, सामाजिक, राजकीय समानता पस्थापित झाली आहे, या देशात आता कोणत्याही पकारची विषमता नाही, या तथाकथित उच्चवर्गीयांच्या सुरात सूर मिसळविणे होय.
भावनिकता महत्त्वाची की बंधुभाव?
`दलित' या शब्दाला आजच्या स्थितीत अत्यंत व्यापक अशी स्विकारार्हता लाभली आहे. `दलित' म्हणजेच आर्थिक अथवा सामाजिक भेदभावाला बळी पडलेले समूह ही या शब्दाची मूळ व्याख्या समजून घेतल्यास विषमतेविरूद्धच्या लढाईला आणखी बळ मिळू शकते. कारण दलित या वर्गवारीमुळे सामाजिक आणि आर्थिक भेदभावांनी ग्रस्त अशा समूहांच्या सदस्यांमध्ये एक वर्गभावना जागृत होते. सारख्याच समस्येने ग्रस्त असलेले लोक स्वतची ओळख एका समूहाच्या नावाने स्थापित करण्याऐवजी बौद्ध, आदिद्रविड, आदिकन्नडीग, आदिआंध्रा, आदिधर्मी, रविदासी, अस्पृश्य ख्रिश्चन, अस्पृश्य मुस्लिम, अस्पृश्य शीख, चांभार, पfिरया, माला, चांडाळ, रामनामी, सतनामी इ. कोणत्याही जातीवाचक अथवा धर्मवाचक नावाने स्थापित करू लागले तर या विभिन्न समाजघटकांचा एक वर्ग कधीच बनणार नाही. त्यांची जातीय ओळख कायम राहील. यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे बळी असलेल्या या भिन्नजातीय लोकांचा एक वर्ग बनविण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. त्यामुळेच 1935च्या `इंडिया ऍक्ट'मध्ये या जातींना एकत्रितरित्या `अनुसूचित जाती' असे संबोधन मिळाले. संविधानातसुद्धा हेच वर्गवाचक नाव वापरण्यात आले आहे. मात्र, अनुसूचित जाती या वर्गवाचक नावामध्ये स्त्रिया तसेच ख्रिश्चन व मुस्लिम धर्मातील अस्पृश्य जाती यांचा समावेश होत नाही. या सर्व समाजसमूहांची एकत्रित ओळख `दलित' या संज्ञेद्वारेच होऊ शकते. आज भारतातील सर्वच राज्यातील सामाजिक व आर्थिक भेदभावांनी ग्रस्त लोक स्वतला दलित मानतात आणि इतर पांतातील अशाच भेदभावाचे बळी असलेल्यांपती बंधुभाव दाखवितात. या स्थितीत महाराष्ट्रातील बौद्धांनी केवळ भावनिकतेपोटी इतर पांतातील सामाजिक आणि आर्थिक भेदभावाचे बळी असलेल्या समूहांपासून स्वतचे विलगीकरण करून त्यांच्याशी पस्थापित होऊ शकणारे बंधुभावाचे नाते तोडणे उचित होणार नाही.
दलितांमधील साहित्यिक, विचारवंत, अर्थतज्ञ, पत्रकार, उद्योजक इत्यादींना दलित ही बिरुदावली लावली जाते हा त्यांचा एकपकारे अपमान आहे, असाही एक आक्षेप घेतला जातो. जगाच्या पाठीवर खंडीय, वांशीक, भाषिक, पांतीय, रंगभेदी संबोधने पचलित आहेत. जसे ब्लॅक पेसिडेन्ट, ज्युईश साईन्टीस्ट, एशियन इकॉनॉमिस्ट, लॅटीन अमेरिकन लिटरेट, मुस्लिम जर्नलिस्ट इत्यादी अनेक उदाहरणे देता येतील. जोपर्यंत अशा संबोधनांचा उद्देश मूलभूत मानवी हक्काच्या पायमल्लीचा, तुच्छतादर्शक नसेल तोपर्यंत अशा संबोधनांना आक्षेप घेणे चुकीचे ठरते. अमेरिकेत कृष्णवर्णीयांचा उल्लेख `निगर्स' म्हणून केला तर तो तुच्छतादर्शक म्हणून विरोधास पात्र ठरतो. कारण `निगर्स'चा अर्थ गुलामी करण्यासाठी विकत घेतलेले गुलाम असा होतो. भारतातही `दलित' या संबोधनाचा वापर अस्पृश्य या अर्थाने जातीय निचता दर्शविण्यासाठी केल्यास तो गुन्हा ठरेल. परंतु, `दलित' हे संबोधन स्थितीवाचक अर्थाने वापरल्यास त्यास आक्षेप घेण्याचे कारण असू नये. मात्र, त्यासाठी `दलित' या शब्दाची व्याप्ती केवळ काही जातींपुरती मर्यादित न ठेवता ती सर्वजातीय शोषितांपर्यंत पोहचविली पाहिजे.
दलित केवळ भारतातच नाहीत
दलित म्हणजे केवळ भारतातील अस्पृश्य जाती हा भ्रम तथाकथित उच्चजातीयांपमाणे तथाकथित निम्नजातीयसुद्धा बाळगून आहेत. भारतापमाणेच इतरही अनेक देशांतील सामाजिक आणि आर्थिक भेदभावाचे बळी असलेल्या समूहांना दलित व तत्सम संज्ञेत समाविष्ट केले गेले आहे. जपानमध्ये बुराकुमीन लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नोकऱयांमध्ये काही पमाणात आरक्षण व शैक्षणिक सवलती दिल्या गेल्या आहेत. नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश या देशांतही दलित जातीसमूह आहेत व त्यांच्या उन्नतीसाठी त्या-त्या देशाच्या सरकारने पयत्न चालविले आहेत. युरोपमध्ये कॅगोट्स तसेच रोमा जमाती, येमेनमध्ये अल्-अख्दम, कोरियामध्ये बिकजोआंग, सोमालियामध्ये मिदगान, न्युझिलंडमध्ये माओरी व पोलिनेशियन, मॅसेडोनियामध्ये अल्बानियन्स असे अल्पसंख्यांक व सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल समूह आहेत. या समूहांपैकी अनेक देशातील समूह स्वतला दलितांपमाणे मानतात. यातील काही सामाजिक समूहांनी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा अभ्यास करून भारतीय दलितांशी जवळीक साधण्याचाही पयत्न केला आहे. जपानमधील बूराकू नॅशनल लिगने बसपा संस्थापक कांशिराम यांना त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी पमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. रोमानियामधील `रोमा' जमातीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा अभ्यास करून त्यांच्या लढ्याला नवी दिशा देण्याचा पयत्न चालविला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपण स्वतला दलित या स्थितीदर्शक संज्ञेखाली एकवटून अखिल भारतीय तसेच जागतिक समुदायाशी जवळीक साधायची की, बौद्ध/नवबौद्ध म्हणून स्वतला मर्यादित करायचे हा निर्णय पत्येकाने स्वतच्या विवेकबुद्धीने घ्यावयास हवा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment