Follow palashbiswaskl on Twitter

ArundhatiRay speaks

PalahBiswas On Unique Identity No1.mpg

Unique Identity No2

Please send the LINK to your Addresslist and send me every update, event, development,documents and FEEDBACK . just mail to palashbiswaskl@gmail.com

Website templates

Jyoti basu is dead

Dr.B.R.Ambedkar

Saturday, April 6, 2013

लोकशाही समाजवाद राबविणारा शासक by Sunil Khobragade (Notes) on Wednesday, March 6, 2013 at 7:16pm


लोकशाही समाजवाद राबविणारा शासक

by Sunil Khobragade (Notes) on Wednesday, March 6, 2013 at 7:16pm

जगातील साम्राज्यवादाचा केंद्रबिंदू असलेल्या अमेरिकेच्या नाकावर टिच्चून लॅटिन अमेरिकेत आपला स्वतंत्र अजेंडा राबविणारे कांतीयोध्दे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. त्यात क्युबाचे फिडेल कॅस्ट्रो अग्रस्थानी आहेत. त्यांच्यापाठोपाठ व्हेनेझुएलाचे ह्युगो चावेझ यांचा कम लागतो. लॅटिन अमेरिकेच्या क्षितीजावरील हा तारा आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. दुसऱया महायुध्दानंतर सुरू झालेल्या शीतयुध्दाचा मुख्य अजेंडा जगात निरंकुश भांडवलशाहीची प्रस्थापना करणे हा राहिला आहे. या शीतयुद्धाचा निर्माता आणि आश्रयदाता असलेल्या अमेरिकेने भांडवलदारी समाजव्यवस्थेला विरोध करणारे सरकार जगात कुठेही टिकाव धरु नये यासाठी नाना क्लृप्त्या लढविल्या. अमेरिकेच्या या दादागिरीला लॅटिन अमेरिकेत फिडेल कॅस्ट्रो यांनी पहिल्यांदा शह दिला. 1959 मध्ये कॅस्ट्रो यांनी अमेरिकापुरस्कृत क्यूबातील बटिस्टा सरकार उलथून टाकले. कॅस्ट्रोंच्या या क्यूबन कांतीमुळे लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांच्या देशभक्तांमध्ये  साम्यवादी व समाजवादी क्रांती करुन कल्याणकारी राज्यव्यवस्था प्रस्थापित करण्याची चेतना  जागृत झाली. अशा देशभक्तांपैकी ह्युगो चावेझ हे एक होते. चावेझ व्हेनेझुएलाच्या सैन्यदलात होते. अमेरिकेच्या तंत्राप्रमाणे चालणाऱया व्हेनेझुएलियन सरकारविरुद्धची बंडखोरी मोडून काढण्याची जबाबदारी सैन्याकडे होती. परंतु, चावेझ यांच्यावर डाव्या विचाराचा पगडा असल्यामुळे अमेरिकन वर्चस्व समाप्त व्हावे असे त्यांना वाटे. सैन्यात असतानाही ते डाव्या विचारांचे साहित्य वाचत असत. 1992 मध्ये व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था ढासळली असताना त्यांनी सशस्त्र क्रांतीद्वारे सरकार पाडण्याचा पयत्न केला. परंतु, त्यांचा पहिला पयत्न फसला. त्याच वर्षी त्यांनी दुसऱयांदा बंडाचे निशाण फडकावले. त्यातही त्यांना यश लाभले नाही. उलट त्यांना दोन वर्षे तुरूंगात काढावी लागली. दोन वेळेच्या अनुभवानंतर त्यांना सशस्त्र क्रांतीचा फोलपणा जाणवला. त्यामुळे त्यांनी राजकीय पक्ष स्थापन करून 1998ची अध्यक्षीय निवडणूक लढवली. या निवडणुकीनंतर सलग चार वेळा अध्यक्ष म्हणून निवडून येऊन त्यांनी व्हेनेझुएलात समाजवादी राजवट पस्थापित केली. म्हणजेच लोकशाहीच्या निवडणूक पध्दतीने निवडून आलेले ते लॅटिन अमेरिकेतील पहिले अध्यक्ष. फिडेल कॅस्ट्रो यांनी सशस्त्र कांती केली. मात्र, चावेझ यांनी लोकशाही मार्गाने निवडून येऊन कांतीकारी समाजवाद व्हेनेझुएलात रूजवला. चावेझचे हे क्रांतीकार्य बाबासाहेबांच्या संकल्पनेतील `स्टेट सोशॅलिझम'ची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे ठरते. भारतीय संविधानातील नीतीनिर्देशक तत्वाची अंमलबजावणी केल्यास भारतातही लोकशाही समाजवाद प्रत्यक्षात येऊ शकतो. भारतीय राज्यकर्ते ही बाब दुर्लक्षित करुन अमेरिकेला खूष करण्यासाठी सरकारी उद्योगाचे आणि सरकारी साधनसंपत्तीचे खाजगीकरण करण्याचे राष्ट्रद्रोही कृत्य करीत आहेत. ह्युगो चावेझ सारख्या देशभक्तांनी मात्र बलाढ्य अमेरिकेच्या दादागिरीला भीक न घालता व्हेनेझुएलाच्या हाडीमासी खिळलेला भांडवलवाद नष्ट करुन राष्ट्रबांधणीचे महान कार्य केले आहे. सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या प्रस्थापनेचे  स्वप्न पाहणाऱया भारतीय देशभक्तांनी चावेझच्या या क्रांतीकार्याची निश्चितच दखल घेतली पाहिजे. व्हेनेझुएला हा तेलसंपन्न देश. देशाच्या एकूण निर्यातीपैकी 95 टक्के निर्यात तेलाची होते. तेलातून मिळणारा पैसा सामाजिक योजनांवर खर्च करणे हे सूत्र चावेझनी अखेरपर्यंत कायम राखले. आरोग्य, शिक्षण, सामाजिक सुरक्षा, अन्न व जमीन वाटप या मुद्यांवर त्यांनी विशेष जोर दिला. त्यामुळेच लॅटिन अमेरिकेत दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत समाजवादी व्हेनेझुएलाचा वरचा कमांक लागतो. एकहाती सलग 14 वर्षांच्या सत्तेनंतरही सत्तेची हवा त्यांच्या डोक्यात गेली नाही. व्हेनेझुएलातील गरिबांचे मसीहा अशी ओळख त्यांनी निर्माण केली. अमेरिकेच्या दादागिरीला न घाबरता चावेझ यांनी हे साध्य केले हे विशेष. क्यूबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांच्यापमाणे अमेरिकेने चावेझ यांच्याविरूध्द कटकारस्थाने केली नाहीत. मात्र, व्हेनेझुएलाला आपल्या अंकित ठेवण्याचा पयत्न अमेरिकेने सातत्याने केला आणि आजही करीत आहे. कॅस्ट्रो यांच्याशी मैत्री असल्याने चावेझ यांच्यावर अमेरिकेची खप्पामर्जी होती. अमेरिकेने चावेझ यांना ठार मारण्याचाही प्रयत्न केला असे बोलले जाते. त्यांना कर्परोग होता. अमेरिकेने विषपयोग केल्याने त्यांना कर्परोग झाल्याचा आरोप व्हेनेझुएलाचे उपाध्यक्ष निकोलस यांनी केला आहे.  त्यातील खरेखोटे लवकरच बाहेर येईल. चावेझ यांनीही अमेरिकेवर टीका करण्याची संधी कधी सोडली नाही. 11/9 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तान आणि इराकमध्ये लष्करी कारवाई केली. अनेक देश एकतर अमेरिकेला पाठिंबा देत असताना किंवा तटस्थ राहणे पसंत करीत असताना चावेझ यांनी अमेरिकेवर तोफ डागली होती. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी अमेरिका दहशतवाद निर्माण करीत आहे, अशा कठोर शब्दांत त्यांनी अमेरिकेच्या युध्दखोरीचा समाचार घेतला होता. भारतामधील दहशतवादी कारवायांना  अमेरिका व इस्त्रायलचा  छुपा पाठिंबा आहे. मात्र याचा उघडपणे धिक्कार करण्याची कुवत भारतीय राज्यकर्ते दाखवू शकत नाहीत. या पार्श्वभूमिवर चावेझ यांच्या अमेरिका विरोधी भूमिकेला तपासल्यास त्यांच्यातील बेडर क्रांतीकारक अधिकच उठून दिसेल. 2008 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या बराक ओबामा यांचे चावेझ यांनी मोकळेपणाने अभिनंदन केले; मात्र, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला त्यांचा विरोध कायम राहिला. त्यांच्याकडून आणखी एक गोष्ट इतर देशांच्या अध्यक्षांनी आणि पधानमंत्र्यांनी शिकण्यासारखी आहे. ती म्हणजे जनतेशी संवाद. चावेझ आठवड्यातून एकदा व्हेनेझुएलियन जनतेला उद्देशून भाषण करीत. सरकारसंचालित वाहिनीवरील एका साप्ताहिक शोमध्ये त्यांना थेट पश्न विचारण्याची संधी नागरिकांना मिळत असे. 2011 मध्ये त्यांना कर्परोगाचे निदान झाल्यानंतर त्यांचा जनसंवाद कमी झाला. त्यांच्यावर क्यूबा येथे नुकतीच चौथी शस्त्रकिया झाली होती. क्यूबाशी त्यांचे अनोखे नाते होते. क्यूबाचे माजी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांना ते पितासमान मानत. कॅस्ट्रो-चावेझ यांच्यात समान धागा होता तो डाव्या विचारांचा; आणि अर्थात पखर अमेरिकाविरोधाचा. मध्यंतरी चावेझ निधनाची अफवा होती. फेब्रुवारीमध्ये चावेझ यांनी क्यूबातून मायदेशी परतून पुन्हा सकिय होण्याची आशा व्यक्त केली होती. मात्र, या योध्द्याची कर्परोगासोबतची झुंज अखेर मंगळवारी संपली. त्यांच्या निधनाने आंतरराष्ट्रीय राजकारणातील मुत्सद्दी कुटनितिज्ञ काळाच्या पडद्याआड गेला आहे. एका वादळी पर्वाचा अस्त झाला आहे.

No comments: