Follow palashbiswaskl on Twitter

ArundhatiRay speaks

PalahBiswas On Unique Identity No1.mpg

Unique Identity No2

Please send the LINK to your Addresslist and send me every update, event, development,documents and FEEDBACK . just mail to palashbiswaskl@gmail.com

Website templates

Jyoti basu is dead

Dr.B.R.Ambedkar

Wednesday, September 28, 2011

Fwd: [जाती विरहीत जनआंदोलन] New Doc: मनुस्मृतिचा संदर्भ : by Swamiji Nishchalanand



---------- Forwarded message ----------
From: Swapneel Kherdekar <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/9/27
Subject: [जाती विरहीत जनआंदोलन] New Doc: मनुस्मृतिचा संदर्भ : by Swamiji Nishchalanand
To: जाती विरहीत जनआंदोलन <209928362399767@groups.facebook.com>


created the doc: "मनुस्मृतिचा संदर्भ : by...
Swapneel Kherdekar created the doc: "मनुस्मृतिचा संदर्भ : by Swamiji Nishchalanand"
  • मनुस्मृतिचा संदर्भ :

    by Swamiji Nishchalanand on Thursday, September 8, 2011 at 3:16pm

     

    अनेकवेळा कसल्यातरी वादात जातिव्यवस्थेच्या संदर्भात मनुस्मृतिचा उल्लेख केलेला दिसतो आणि मग मनुस्मृति आणि तथाकथित "मनुवादी" लोकांना यथेच्छ शिव्या घातलेल्याही दिसतात.

    पण मनात एक प्रश्न वारंवार येतो.... मनुस्मृति किंवा अन्य कोणत्याही स्मृतिला अभिप्रेत समाजव्यवस्थेचा कोणीतरी विचार केलाय का...? कारण आज सुद्धा मनुप्रणीत व्यवस्थेची बाजू घेणारे फक्त एकांगी विचार मांडतानाच दिसतात.

    --------------

     

    मुळात स्मृतिग्रन्थांनी केवळ वर्णव्यवस्था कधीच सांगितलेली नाही. जी सांगितली ती वर्णाश्रमव्यवस्था सांगितली. म्हणजे जर सामाजिक पातळीवर वर्णभेदाचा विचार मांडला तर प्रत्येका व्यक्तिच्या व्यक्तिगत जीवनासाठी तितक्याच अनिवार्यपणे आश्रमव्यवस्था सुद्धा सांगितली. वर्ण आणि आश्रम या दोन्हींचा एकत्रित विचार केल्यावर त्या ग्रंथांना अभिप्रेत समाजाचं फार वेगळंच चित्र उभं रहातं.

     

    १) आश्रमव्यवस्थेनुसार आठ-दहा वर्षाच्या वयात मुलाला शिक्षणासाठी गुरुगृही पाठवण्याचा निर्देश येतो. आता गुरुगृह कशा प्रकारचे याला गौण मानून यामागचा खरा दृष्टिकोण समजणं गरजेचं आहे. गुरुगृहात पाठवायचं म्हणजे आईवडिलांपासून दूर पाठवायचं...! याचा सरळ अर्थ असा की मुलाच्या शिक्षणाबाबत त्याच्या कुटुंबाच्या दृष्टिकोणाला महत्त्व नव्हतं. मुलाच्या क्षमतेनुसार योग्य तो शिक्षणक्रम गुरुकुलात ठरायचा. साहजिकच कोणत्याही कुटुंबात वंशपरंपरागत व्यवसायाची फारशी शक्यता उरत नव्हती. आज दिसणारी व्यवसायांशी निगडित जातिव्यवस्था ही केवळ समाजाने आश्रमधर्म धाब्यावर बसवल्यानंतर उद्भवली आहे. जन्म कोणत्याही कुळातला असला तरी स्वत:च्या क्षमतेच्या बळावर अन्य वर्णाचा व्यवसाय करू शकण्याची मुभा प्रत्येकालाच होती. "जन्मना जायते शूद्र:" म्हणजे जन्माच्या वेळी प्रत्येकजण शूद्र(अक्षम)च असतो, आणि "संस्कारात्‌ द्विज उच्यते" म्हणजे शिक्षणासहित सर्व प्रकारच्या संस्कारांमुळे व्यक्तिचा वर्ण निश्चित होतो, असंच स्मृतिवचन आहे.

     

    २) शिक्षणाच्या काळात व्यावहारिक अर्थार्जनाबरोबरच पारमार्थिक तत्त्वज्ञानाचेही शिक्षण गुरुकुलात दिले जात असल्याने स्नातक झालेल्या विद्यार्थ्यासमोर सामाजिक/कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी गृहस्थाश्रम स्वीकारायचा की पारमार्थिक ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी संन्यास घ्यायचा हा खुला पर्याय उपलब्ध असे. तसं म्हटलं तर ब्रह्मचर्याश्रमानंतर संन्यास हाच या स्मृतिग्रंथांना अभिप्रेत सरळमार्ग दिसतो.... कारण जर स्नातक झालेल्या युवकाला गृहस्थाश्रम स्वीकारायचा असेल तर त्यासाठी "समावर्तन" ("सोडमुंज" हे त्या संस्काराचे प्रचलित नाव..!) हा वेगळा संस्कार करावा लागे.

     

    ३) आता गृहस्थाश्रमात पुढच्या पिढीचा प्रवेश झाल्याबरोबर मातापित्याचा वानप्रस्थाश्रम सुरु होणे त्याच स्मृतिग्रंथांनी अनिवार्य केले होते. म्हणजे नातवंडा-पंतवंडांना खेळवत मरेपर्यन्त घरावर शासन करत वृद्ध पिढीने घरात राहणे स्मृतिग्रन्थांना कुठेच मान्य दिसत नाही...! आश्रमव्यवस्था पाळायची झाली तर एकत्र कुटुंबपद्धती राहूच शकत नाही...! नेमका गोंधळ इथेच झाला...!

    गेल्या हजारभर वर्षांचा इतिहास पाहता घरोघरीच्या वृद्धांनी वानप्रस्थ आणि संन्यास या दोन्ही आश्रमांचा स्वीकार करणंच सोडून दिलेलं दिसतं.... आणि साहजिकच यातून वंशपरंपरागत व्यवसाय, पुढच्या पिढीची मुस्कटदाबी करत तिच्या हक्कांवर गदा आणणारी generation gap आणि कौटुंबिक संपत्तिचे तुकडे पडू नयेत या स्वार्थापोटी एकत्र कुटुंबव्यवस्था (बंगालसारख्या ठिकाणी तर घरातल्या लहान वयाच्या विधवांना जबरदस्ती "सती" करण्याची प्रथा सुद्धा यातूनच उद्भवली) वगैरे चुकीच्या गोष्टी समाजाने निर्लज्जपणे स्वीकारल्या.

     

    ४) एकत्र कुटुंबपद्धतिमध्ये घरातील वृद्धांचेच शासन चालत राहिल्याने मुलगा वयाच्या साठीला आला तरी ऐंशी-नव्वद वर्षाच्या वडिलांसमोर त्याच्या हातात कुटुंबव्यवस्थेची सत्ता कधी आलीच नाही.... मग त्याच्या तिशीतल्या मुलाचं लग्न झालेलं असलं तरी  त्याने घरात दुय्यम दर्जाचा सदस्य म्हणून राहणंच क्रमप्राप्त होतं....! आपल्या हातात स्वत:च्या जीवनाचे निर्णय घेण्याचा हक्क असावा ही तर प्रत्येक माणसाचीच इच्छा असते. आश्रमव्यवस्थेच्या उल्लंघनातून जन्मलेल्या एकत्र कुटुंबपद्धतीमुळे घरातल्या युवकांना कसलेच अधिकार मिळणं शक्य न झाल्याचा दुष्परिणाम असा झाला की ते आपली ही सत्तेची लालसा घराबाहेरच्या समाजातल्या दुर्बळांवर शिरजोरी करून पुरी करत गेले. आणि आधी व्यवसायाच्या आधारावर निर्माण होत गेलेल्या जातींमध्ये भेदभावाचा याच कारणाने जन्म झाला.

     

    गेल्या काही शतकांमध्ये समाजव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या सगळ्याच विकृतिंच्या मागे सर्वांनी सरसकट केलेला आश्रमव्यवस्थेचा त्याग कारणीभूत दिसतो. सामाजिक अधिकारभेदाच्या वर्णव्यवस्थेबरोबरच प्रत्येका व्यक्तिसाठी कर्तव्यपालन आणि त्याग याकरिता स्मृतिग्रंथांनी दिलेली आश्रमव्यवस्था ऐच्छिक नव्हती... प्रत्येका व्यक्तिसाठी अनिवार्य होती. पण समाजातल्या गेल्या अनेक पिढ्यांनी स्वत:च्या उपभोगप्रधान स्वार्थाखातर त्यागाच्या या मार्गाचाच त्याग केला. इतकंच नव्हे, तर गेल्या काही शतकांमध्ये उपभोगप्रधान एकत्र कुटुंबव्यवस्थेलाच आपली "संस्कृति" मानण्याचे तर्क सुद्धा उभे केले..!

    ----------

     

    ही बरीच विस्ताराने विचार करण्याजोगी बाब आहे. परन्तु मनुस्मृतिच्या बाजूने असो वा विरोधात, जातिभेदाच्या बाजूने असो वा विरोधात... बोलणाऱ्या वा लिहिणाऱ्या कोणीही अवाक्षराने सुद्धा आश्रमव्यवस्थेचा विचार केलेला का दिसत नाही, हे मला तरी न उलगडलेले कोडे आहे...!!

     

    - स्वामीजी


View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments: