Thursday, June 9, 2011

बैल गेला; झोपा केला! मुंबईसह महाराष्ट्र अनुभवणार आज शिवशक्ती—भीमशक्तीचा विराट महामोर्चा!

बैल गेला; झोपा केला! 

मुंबईसह महाराष्ट्र अनुभवणार आज शिवशक्ती—भीमशक्तीचा विराट महामोर्चा


 

सत्ताधार्‍यांची जाहीर करण्याची संपत्ती किती आणि जाहीर न करण्याची किती असते हे आता जनतादेखील ओळखून आहे. 


बैल गेला; झोपा केला
केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांनी स्वत:ची आणि आपल्या कुटुंबीयांची मालमत्ता जाहीर करावी असे आदेश पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिले आहेत. 'बैल गेला आणि झोपा केला' असाच हा प्रकार आहे. ही मंडळी दुसर्‍यांदा सत्तेवर आली आम आदमीच्या नावाने. कारभार मात्र केला 'खास आदमी'साठी. हे खास आदमी मंत्रिमंडळात जसे आहेत तसे बाहेरचेदेखील आहेत. त्यामुळे मिल बांटके खाओ असाच कारभार दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरू आहे. त्या जोडीला रोजच्या रोज वाढणारी महागाई, पेट्रोल-डिझेलचे भडकणारे दर आहेतच. पुन्हा सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांचा आणि कॉंग्रेस नेत्यांचा तिहार तुरुंगातील मुक्काम इतक्यात संपण्याची चिन्हे नाहीत. ए. राजा, कनिमोझी, सुरेश कलमाडी हे सगळे सत्ताधारी रथी-महारथी सध्या तिहारची हवा खात आहेत. त्यात आता 'स्पेक्ट्रम घोटाळ्या'च्या रडारवर माजी दूरसंचारमंत्री आणि विद्यमान वस्त्रोद्योगमंत्री दयानिधी मारन हेदेखील आले आहेत. दयानिधी हे करुणानिधी यांचे नातू आहेत. द्रमुकचा एक मंत्री आधीच तुरुंगात आहे. त्याशिवाय करुणानिधी कन्या कनिमोझी यांचा 'तिहारवास'देखील सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने वाढला आहे. त्यात मारन यांना 'एअरसेल' कंपनीचे प्रकरण भोवण्याची चिन्हे आहेत. अर्थात, केंद्रीय मंत्रीपदाचे कवच असल्याने सध्या तरी ते सुरक्षित आहेत. मात्र उद्या त्यांचाही 'राजा' होणार नाही कशावरून? एकीकडे देशाच्या इतिहासातील सर्वाधिक घोटाळेबाज सरकार अशी विद्यमान केंद्र सरकारची नोंद झाली असताना दुसरीकडे रामदेवबाबांचे शांततामय आंदोलन मध्यरात्रीच्या अंधारात चिरडून सत्ताधार्‍यांनी स्वत:चा कथित लोकशाहीवादी मुखवटा आपल्याच हाताने टराटरा फाडला. बुडत्याचा पाय खोलात अशी अवस्था पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि त्यांच्या सरकारची झाली आहे. हा खोलात जाणारा पाय बाहेर काढण्याचा, चेहर्‍यावर पडलेला 
घोटाळ्यांचा चिखल 
साफ करून नवा 'स्वच्छ' चेहरा जनतेला दाखवायचा त्यांचा आटापिटा सुरू आहे. सत्ताधारी मंत्र्यांनी मालमत्ता जाहीर करण्याचा आदेश हा याच रंगसफेदीचा प्रकार आहे. अर्थात अशा रंगसफेदीमुळे खरा चेहरा पुसला जाईल आणि नवा कोरा मुखवटा त्यावर बसेल असे मनमोहन सिंग आणि सोनियांना वाटत असेल तर तो भ्रमाचा भोपळा ठरेल. बरं, केंद्रीय मंत्र्यांना मालमत्ता जाहीर करण्याचा आदेश दिला म्हणजे केलेले पाप धुऊन निघाले असे कुठे आहे? पंतप्रधानांचा हा आदेश गंगेच्या पाण्याने काढला आहे असे कॉंग्रेसवाल्यांना म्हणायचे आहे का? या आदेशाने घोटाळेबाज मंत्री लगेच पवित्र होतील आणि जनतादेखील या 'पवित्र' मंडळींना माफ करील असे पंतप्रधानांना वाटते का? केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांनी त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तसेच इतर आर्थिक व्यवहार, रोकड, दागदागिने यांची माहिती संबंधित आर्थिक वर्षात पंतप्रधान कार्यालयाकडे देण्याचे बंधन नव्या आचारसंहितेमुळे घातले जाणार आहे. तसेच मंत्र्यांच्या कुटुंबातील कोणाचीही व्यावसायिक भागीदारी किंवा व्यवस्थापनातील पद स्वीकारले तर त्याचीही माहिती संबंधित मंत्र्याने पंतप्रधान अथवा मुख्यमंत्र्यांकडे देणे बंधनकारक असेल. पंतप्रधानांचा हेतू चांगला असला तरी बेनामी व्यवहारांचे काय? कॉंग्रेसवाले काय किंवा राष्ट्रवादीवाले काय, अशा बेनामी व्यवहारात 'नामी' आहेत. प्रश्‍न राहिला व्यावसायिक हितसंबंधांचा. ते तरी थेट कुठे असतात? कॉंग्रेसवाल्यांचे व्यावसायिक हितसंबंध नेहमीच वादग्रस्त राहिले असले तरी त्यात गुंतलेला त्यांचा 'हात' अदृश्य असतो, तो कधीच सापडत नाही. विरोधकांनी पकडायचा प्रयत्न केला तरी कॉंग्रेसवाले तो एवढ्या सफाईने झटकतात की त्यांच्या या 'हाथ की सफाई'ने विरोधकांनीही चाट पडावे! मनमोहनजी, 
जनतेला मूर्ख बनविण्याचे धंदे 
बंद करा. सत्ताधार्‍यांची जाहीर करण्याची संपत्ती किती आणि जाहीर न करण्याची किती असते हे आता जनतादेखील ओळखून आहे. केंद्रीय मंत्र्यांनी त्यांची व कुटुंबांची मालमत्ता तुमच्या आदेशानुसार जाहीर केलीतरी त्यातील खरेपणावर कोणाचा विश्‍वास बसणार? मुळात तुमच्या सरकारने जनतेचा विश्‍वासच गमावला आहे. मंत्र्यांच्या मालमत्ता जाहीर करा नाहीतर आणखी कुठली 'आचारसंहिता' लादा, त्यामुळे केंद्र सरकारचे डुबते जहाज तरणार नाही. घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या खडकावर आपटून ते फुटले आहे. उद्या या आदेशानुसार केंद्र आणि राज्यातील मंत्री त्यांची संपत्ती जाहीर करतीलही, व्यावसायिक संबंधांचा तपशील पंतप्रधान - मुख्यमंत्र्यांकडे देतीलही, पण ही माहिती जनतेसमोर येणार आहे का? हा प्रकार म्हणजे मंत्र्याने त्याचा राजीनामा राज्यपाल किंवा राष्ट्रपतींकडे न देता पक्षप्रमुखाकडे देण्यासारखे आहे. तुम्हाला तुमच्या सरकारच्या प्रतिमेची काळजी आहे ना, मग हा तपशील थेट जनतेलाच सादर करा. आहे का तेवढी हिंमत? एकीकडे मंत्र्यांना मालमत्ता जाहीर करायला लावण्याचे आदेश द्यायचे. सरकारच्या शुद्धीकरणाचा आव आणायचा. मात्र दुसरीकडे सरकार वाचविण्याची वेळ उद्या आलीच तर अडचण नको म्हणून चारा घोटाळ्यात आकंठ बुडालेल्या लालू यादवांचा एकदा सोडलेला हात पुन्हा धरायचा. एक भ्रष्ट हात सोडावा लागला तर दुसरा भ्रष्ट हात हातात घ्यायचा आणि वर प्रतिमा सुधारण्याच्या गमजा करायच्या. लोकपाल विधेयकात पंतप्रधान वगैरेंचा समावेश असावा की नसावा याबाबत गोंधळात असणारे सत्ताधारी मंत्र्यांच्या मालमत्ता जाहीर करण्याचा विनोद करीत आहेत. मंत्र्यांच्या मालमत्ता कसल्या जाहीर करता? या देशातील 'आम आदमी'ची हिशेबी मालमत्ता कशी वाढेल, तेवढा सुदृढ तो कसा होईल हे पाहा. 

 

मुंबईसह महाराष्ट्र अनुभवणार आज शिवशक्ती—भीमशक्तीचा विराट महामोर्चा
आझाद मैदान : दुपारी २ वाजता
- उद्धव ठाकरे, रामदास आठवले, गोपीनाथ मुंडे यांच्या भाषणांकडे लक्ष
- आघाडी सरकारच्या काळ्या कारभाराचा 'पंचनामा' होणार
- गावागावातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आणि भीमसैनिक मुंबईच्या दिशेने
मुंबई, दि. ८ (विशेष प्रतिनिधी) - राज्यातील जनतेला महागाईच्या खाईत ढकलणार्‍या आणि दलितांवर अमानुष अत्याचार करणार्‍या घोटाळेबाज कॉंग्रेस आघाडी सरकारविरोधात शिवसेना, भाजप व रिपाइंच्या महायुतीचा विराट महामोर्चा उद्या, गुरुवारी आझाद मैदानात धडकणार आहे. त्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.............


आगे बढो!
'आगे बढो!' असा आदेशच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी आज येथे दिला. उद्या निघणार्‍या शिवशक्ती-भीमशक्तीच्या अतिविराट महामोर्चाच्या संदर्भात ते बोलत होते. 
शिवसेनाप्रमुख पुढे म्हणाले, 'आज शिवशक्ती-भीमशक्तीचा महामोर्चा निघत आहे. हा महामोर्चा इतका जबरदस्त राहू द्या की देशातील कॉंग्रेस राजवटीचे भिकार, दळभद्री सरकार बदलण्याची दिशा या शिवशक्ती-भीमशक्तीच्या महामोर्चात असायलाच हवी. ..............

 


- मी शिवसेनेसोबत आलो तुटलेली मने जोडण्यासाठी सारा महाराष्ट्र फिरणार आहोत गरीबांच्या रोजीरोटीसाठी येत्या निवडणुकीत उभे ठाकणार कॉंग्रेस आघाडीला गाडण्यासाठी.
- रामदास आठवले

 

 

आझाद मैदान सोयीसुविधांनी सज्ज 
मैदानात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून फिरते शौचालयही असेल. याशिवाय चार प्रथमोचार केंद्रे, दोन रुग्णवाहिका व अग्निशमन बंबही तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी दिली. 

 

६० बाय ३० फुटांचे भव्य व्यासपीठ
सभेसाठी ६० बाय ३० फुटांचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. व्यासपीठावर शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे, रिपब्लिकन नेते रामदास आठवले व भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह शिवसेना, भाजप व रिपाइंचे प्रत्येकी १५ असे ४५ मान्यवर नेते बसणार आहेत.



आज भीमसैनिकांचे कुटुंबकबिल्यासह चलो आझाद मैदान!
भीमराव गवळी
मुंबई, दि. ८ - हिंदुस्थानातील सर्वात भ्रष्ट कॉंग्रेस सरकारला 'चले जाव'चा निर्वाणीचा इशारा देण्यासाठी शिवशक्ती-भीमशक्तीच्या उद्या आझाद मैदानावर होणार्‍या मोर्चाची आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. आंबेडकरी 'निळ्या' वस्त्यांमध्ये आज दिवसभर 'जोर बैठकांचा दौर' होता. उद्या वर्किंग डे असूनही चळवळीशी बांधिलकी मानणारे हजारो लोक कामधंदा बाजूला सारून कुटुंबासहित मोर्चात सहभागी होणार आहेत. तर बर्‍याचजणांनी मोर्चासाठी अगोदरच ९ जूनची रजा टाकलेली आहे. त्यामुळे उद्या बहुतेक सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये शुकशुकाट राहणार आहे..............



५०० स्वयंसेवकांची फौज तैनात
महामोर्चासाठी ५०० स्वयंसेवकांची फौज तैनात राहणार असून यातील २०० स्वयंसेवक व्यासपीठाच्या परिसरावर देखरेख ठेवतील. उपायुक्त शेरींग दोर्जे आणि सहाय्यक आयुक्त अनिल महाबोल यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या बैठकीत शिवशक्ती-भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले..................



अल्पोपाहार, भोजनाची व्यवस्था
- व्यासपीठाच्या डाव्या बाजूला महिलांसाठी आसन व्यवस्था
- उजवीकडे पुरुषांसाठी
- आमदार, खासदार व पदाधिकार्‍यांसाठी डाव्या बाजूला आसन व्यवस्था
महामोर्चात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून येणार्‍या कार्यकर्त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था डॉ. आंबेडकर कॉलेज, सिद्धार्थ विहार, वडाळा व चैत्यभूमी येथे करण्यात आली आहे. यासाठी विभागप्रमुख भाऊ कोरगावकर, रिपाइंचे सचिव घनश्याम चिरणकर, नगरसेवक हेमंत डोके, रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे, सचिन मोहिते, सिद्धार्थ कासारे, चंद्रकांत कसबे आदी जोमाने परिश्रम घेत आहेत. त्याचबरोबर प्रियदर्शनी चुनाभट्टी येथे बाहेरून येणार्‍यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.............



ही परिवर्तनाची सुरुवात
शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र आल्यामुळे आघाडी सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मोर्चाच्या निमित्ताने राज्यातील सामान्य जनतेच्या हुंकारातून राज्यातील परिवर्तनाला सुरुवात होईल आणि पुढचे सरकार हे महायुतीचे असेल' असा विश्‍वास शिवसेना विधिमंडळ पक्षनेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. लोकांमध्ये सरकारविरोधात मोठा राग आहे. त्यांचा हा आवाज लाखोंच्या संख्येने घुमेल.
- सुभाष देसाई, शिवसेना विधिमंडळ पक्षनेते

शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार होईल
शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र यावी हे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. आझाद मैदानावरील मोर्चाने ते दृश्य स्वरूपात साकार झालेले सर्वांना पाहायला मिळेल. गेल्या दोन महिन्यांतील वातावरण पाहता महाराष्ट्रात राजकीय व सामजिक समीकरणे बदलतील. हा मोर्चा त्याची झलक असेल' अशी प्रतिक्रिया भाजपचे महाराष्ट्र सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केली. 
- विनोद तावडे, भाजप प्रदेश सरचिटणीस

दलित जनतेमध्ये उत्सुकता 
आझाद मैदानावरील हा मोर्चा राज्याच्या इतिहासात नोंद करून ठेवावा असा अभूतपूर्व असेल. दलित जनतेला या मोर्चाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस व राष्ट्रवादीत असलेले दलित कार्यकर्ते शिवशक्ती व भीमशक्तीला येऊन मिळत आहेत. भविष्यात सत्तापरिवर्तन होणार हे निश्‍चित', असे रिपाइंचे प्रवक्ते अर्जुन डांगळे यांनी सांगितले. 
- अर्जुन डांगळे, रिपाइं प्रवक्ते

भीमशक्ती-रिपब्लिकन सेनेचे आवाहन
'आम आदमी'ला महागाईने पोळून काढणार्‍या आणि भ्रष्टाचाराद्वारे देश लुटणार्‍या कॉंग्रेस आघाडीला सत्तेवरून हाकलण्यासाठी राज्यातील दलित जनतेने उद्याच्या महामोर्चाला मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन भीमशक्ती-रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अनिल कांबळे यांनी केले आहे. शिवशक्ती-भीमशक्तीच दलित, शोषित, शेतमजूर, कष्टकरीवर्गाला न्याय देणारे शासन देऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

 

एकजुटीचा आवाज घुमणार
शिवशक्ती-भीमशक्तीच्या महामोर्चाची महातयारी बुधवारी पूर्ण झाली. या महामोर्चाची सांगता प्रमुख नेत्यांच्या भाषणाने होणार आहे. त्यासाठी सभास्थळी मोठ्या संख्येने ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत. त्यांची व्यवस्थाही चोख करण्यात आली आहे.


'श्यामची आई' ७५ वर्षांची झाली
मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - आई-मुलाच्या नात्यातील चिरंतन वैश्‍विक मूल्याचे महत्त्व अधोरेखित करणार्‍या साने गुरुजींच्या 'श्यामची आई' या पुस्तकाला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवादित झालेल्या या पुस्तकाच्या आजवर लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत. चार पिढ्यांवर संस्कार करणार्‍या या पुस्तकाचा अमृत महोत्सव साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट साजरा करणार असून शनिवार, ११ जून रोजी साने गुरुजी स्मृती दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात या सोहळ्यास प्रारंभ होणार आहे..............




नाशकात भीषण स्फोटात तीन ठार 
- दोन मजली इमारत जमीनदोस्त 
- जिलेटीनच्या साठ्यामुळे धमाका 
नाशिक, दि. ८ (प्रतिनिधी) - गजबजलेल्या पंचवटीत तारवालानगर भागात 'सप्तशृंगी अपार्टमेंट'मध्ये आज दुपारी ३ वाजता झालेल्या भीषण स्फोटाने नाशिक हादरले. या धमाक्यात तीनजण ठार तर ११ जखमी झाले. या शक्तिशाली स्फोटाने इमारतीचे दोन मजले, सुमारे १५ दुकाने उद्ध्वस्त झाली. इमारतीच्या पार्किंगमधील कार, दुचाकी वाहने छिन्नविछिन्न होऊन शंभर फूट दूरवर जाऊन पडली. आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. हा स्फोट जिलेटीनचा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे..............


राजघाटावरची लढाई... घामाघूम
योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपोषणावर कॉंगे्रस आघाडी सरकारने 'दबंगशाही' केल्यानंतर बुधवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 'राजघाटा'वर जाऊन लाक्षणिक उपोषण केले. तापलेल्या दिल्लीत घामाघूम झालेले अण्णा मनमोहन सरकारला 'घाम' कधी फोडतात अशी चर्चा राजधानीत रंगली होती................


आता रामदेव आर्मी
११ हजार सैनिकांची सशस्त्र फौज बनविणार

हरिद्वार, दि. ८ (वृत्तसंस्था) - रामलीला मैदानावर पोलिसांनी केलेले अत्याचार रोखता आले असते तर...परंतु आता या जर तरला काही अर्थ नाही. आता ११ हजार जांबाज सैनिकांची सशस्त्र फौज तयार करणार असल्याची घोषणा योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी केली. आपल्या समर्थकांसमोर बोलताना रामदेवबाबा म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यातून २० तरुणांनी पुढे यावे. आम्ही त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊ. या फौजेत महिलांचाही समावेश असेल. आंदोलनाच्या वेळी ही फौज आमचे रक्षण करेल, असेही रामदेवबाबांनी स्पष्ट केले...............



मराठवाड्यात वीज कोसळून आठ ठार
संभाजीनगर : तुफान पावसात वीज कोसळून मराठवाड्यात आठ बळी गेले. नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यात वीज पडून महिलेसह दोन मुली ठार झाल्या. तर पैठण तालुक्यात चार शेतमजूर महिला वीज पडून ठार झाल्या. भारतबाई त्र्यंबक गाडेकर व त्यांची मुलगी भाग्यश्री, स्नेहा कावळे, अर्चना दिलवाले, जानकाबाई गोराटे. मुक्ताबाई राऊत आणि यमुनाबाई आहेरे, नारायण कडुबा खाकरे अशी त्यांची नावे आहेत.

 

No comments:

Post a Comment